पत्रकार आर्थिकदृष्टया जसे सक्षम असले पाहिजेत तव्दतच ते शारीरिकदृष्टयाही फीट असले पाहिजेत असा मराठी पत्रकार परिषदेचा प्रयत्न आहे.त्यासाठी 3 डिसेंबररोजी राज्यातील बहुतेक जिल्हयात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेतली गेली.बीडमध्ये तेव्हा शिबिरं झालं नाही.तेथे आज शिबिर घेण्यात आलं.मोठाच प्रतिसाद लाभला.तपासणी शिबिरं ही परिषदेची लोकचळवळ झाली आहे याचा आनंद नक्कीच आहे.
————————————————-
*बीडमध्ये पत्रकार आरोग्य तपासणी शिबीर *
*मराठी परिषदेचा पुढाकार ः उत्स्फूर्त प्रतिसाद*
बीड / प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभुमीवर शहरातील कोटेच्या हॉस्पिटलमध्ये बीड पत्रकार परिषदेच्या वतीने शुक्रवारी 15 डिसेंबर रोजी पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबीराला पत्रकार परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. याच पार्श्वभुमीवर शुक्रवारी 15 डिसेंबर रोजी आरोग्य शिबीर ठेवण्यात आले. शहरातील नामांकित कोटेच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेल्या शिबीरात डॉ. संजीवनी कोटेचा व डॉ. किशोर कोटेचा यांनी पत्रकाराची मोफत आरोग्य तपासणी केली. या शिबिरात जेष्ठ संपादक राजेंद्र आगवान, नरेंद्र काकरिया, राजेंद्र होळकर, दिलीप खिस्ती, परिषदेेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, सरचिटणीस भास्कर चोपडे, विलास डोळस, विशाल साळूंके, शेखर कुमार, कमलाकर कुलथे, संदिप बेदरे, मुकेश झणझणे, दगडू पुरी, अनिल आष्टपुत्रे, प्रचंड सोळंके, दत्ता देशमुख, राजेश खराडे, संजय तिपाले, प्रदिप मुळे, अभिमान्यू घरत आदींसह शहर व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.