बीडच्या पत्रकाराला धक्काबुक्की करणार्‍या डॉक्टरावर कारवाई होणार

0
829

बीडमधील पत्रकारांना धक्काबुक्की करून त्यांना कोंडण्याचा प्रयत्न करणार्‍या डॉ.संजय पाटील आणि राजू नीरवडे याच्यावर आता कारवाई होऊ शकते.बीडमधील पत्रकारांनी हा विषय गंभीरपणे घेत आज जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेऊन त्यांच्याकडे संतप्त भावना व्यक्त केल्या.नेंत्र विभागात शस्त्रक्रिया झाल्यानंतर चार रू् ग्णांचे डोळे गेले आहेत.त्यामुळे डॉ.पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली.त्यावर कारवाई कऱण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

दृष्टी जाण्याचे प्रकरणच मुळी गंभीर असून हे अतिशय संवेदनशीलपणे हाताळले पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले , माध्यमाचे स्वातंत्र्य आणि त्यांच्या संचारावर बंधन घालायला नको अशी अपेक्षाही स्पष्टपणे बोलून दाखवली बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळात लोकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती जिल्हाध्यक्ष महेश वाघमारे प्रमोद कुलकर्णी उदय जोशी लक्ष्मीकांत रूईकर गोविंद शेळके विकास माने प्रमोद ठोसर प्रमोद जोशी यांचा समावेश होता .

(Visited 83 time, 1 visit today)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here