बीड येथील ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी अतूल कुलकर्णी यांची मराठी पत्रकार परिषदेवर परिषद प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी आज ही घोषणा केली आहे.
अतूल कुलकर्णी हे चळवळीशी निगडीत पत्रकार आहेत.दुष्काळ ,शेती,पाणीप्रश्न यांचा अभ्यास आहे.पत्रकारितेतही लिहिणारा,प्रामाणिक पत्रकार म्हणून बीड जिल्हयात ते लोकप्रिय आहेत. सामांन्यांशी आणि विचारांशी बांधिलकी जपणारा पत्रकार अशी अतूल कुलकर्णी यांची बीड जिल्हयात ओळख आहे.अतूल कुलकर्णी परिषदेशी जोडले गेल्याने त्याचा लाभ नक्कीच परिषद आणि एकूण पत्रकार चळवळीला होणार आहे.
.बीड जिल्हयातील पत्रकारांचे मजबूत संघटन करून परिषदेच्या शाखेची पुनर्रचना करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.परिषदेच्या या निर्णयाचे बीड जिल्हयातील पत्रकारांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे.संघटनेपासून दूर असलेले अनेक पत्रकार आता परिषदेशी जोडले जात असून सदस्य नोंदणी प्रक्रियाला जिल्हाभर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.परिषदेचे अध्यक्ष तथा बीडचे भूमीपूत्र एस.एम.देशमुख यांनी संपूर्ण बीड जिल्हा पिंजून काढला असून जिल्हयातील बहुतेक तालुक्यांना भेटी देऊन चळवळीची माहिती पत्रकारांना दिली आहे.त्याचा चांगालाच परिणाम जिल्हयात जाणवत असून मोठ्या संख्येने पत्रकारांची नोंदणी केली जात आहे.31 जानेवारीपर्यंत सदस्य नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लोकशाही पध्दतीनं ऑनलाईन निवडणुका घेतल्या जाणार आहेत.एखादया पत्रकार संघटनेची जिल्हास्तरीय निवडणूक ऑनलाईन घेण्याचा देशातला पहिला मान बीड जिल्हयाला मिळत आहे.फेब्रुवारीच्या दुसर्या सप्ताहात निवडणुका होतील.निवडणुकांनंतर अस्तित्वात येणार्या नवनिर्वाचित कार्यकारणीचा सत्कार देवडी येथे मान्यवरांच्या हस्ते तसंचे नंतर नांदेड येथे तालुका अध्यक्षांच्या मेळाव्यात 5 मार्च रोजी केला जाणार आहे.