गाडी खाली चिरडून पत्रकारांना ठार करण्याचा ‘नवा ट्रेंड’
बिहार आणि एमपीत दोन घटनांत तीन पत्रकार ठार
माफियांनी पत्रकारांना गाडीखाली चिरडून ठार मारल्याच्या दोन घटना काल समोर आल्या.या दोन घटनांत तीन पत्रकारांची हत्त्या झाल्याचे स्पष्ट झाले आङे.पहिली घटना बिहारमधील भोजपूर येथे घडली.तेथे रामनवमी उत्साहाच्या मिरवणुकीची वार्तांकन करून घरी परणार्या नवीन निश्चल आणि विजय सिंह या भास्करच्या पत्रकारांना स्कॉर्पियोखाली चिरडून ठार करण्यात आले.नवीन निश्चल 35 वर्षांचे तर विजय सिंह 25 वर्षांचे तरूण पत्रकार होते.दोघांचेही जागीच निधन झाले.ज्या गाडीने पत्रकारांना उडविले त्यात त्या भागातला मुखिया महम्मद हरसू आणि त्याचा मुलगा बसलेले होते.घटना घडली त्या दिवशी म्हणजेच रविवारी नवीन आणि हरसू यांच्यात गडूहनी बाजारात वादावादी झाली होती.त्यावेळी याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकी या मुखियानं पत्रकाराला दिली होती.त्यानंतर रात्री आठ वाजता ही घटना घडली.घटना घडल्यानंतर संतप्त जमावाने गाडी पेटवून दिली.आणि ज्या ठिकाणी हत्त्या केली गेली तेथेच मृतदेह ठेवले गेले.रात्री अकरा वाजता पोलीस आल्यानंतर लाठीचार्ज करून पोलिसांनी जमाव पांगविला.हा अपघात नाही तर हत्त्याच आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे.दुपारी धमकी आणि संध्याकाळी हत्त्या असा हा प्रकार आहे.
दुसरी घटना मध्यप्रदेशातील भिंड येथे घडली.वाळू माफिया आणि पोलिसांचे स्टींग ऑपरेशन केल्याच्या रागातून संदीप शर्मा या पत्रकाराला ट्रक खाली चिरडून ठार कऱण्यात आले.तत्पुर्वी त्याला ठार मारणयची धमकी देण्यात आली होती.या विरोधात संदीपने वरिष्ठ अधिकार्यांकडे तसेच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांच्याकडं तक्रार केली होती. या पत्रात आपल्याला सुरक्षा द्यावी,आपल्या जिवितास धोका असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले.संदीप आज सकाळी आठ वाजता आपल्या दुचाकीवरून जात असताना कोतवाली पोलीस ठाण्यापासून जवळच एका ट्रकने संदीपच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.गंभीर जखमी झालेल्या संदीपला लगेच नजिकच्या रूग्णालायत दाखल करण्यात आले.मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला.ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात केद झाली .अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून ट्रक जप्त करण्यात आली आहे.कॉ्रग्रेसने या घटनेचा निषेध केला असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.मुख्यमंत्री चौहान यांनी दोषीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.बिहार आणि एमपीतील या दोन्ही घटनांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती धिक्कार करीत असून गुन्हेगारांना कडक शासन व्हावे अशी मागणी करीत आहे