मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेने काढलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे प्रकाशन काल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले.त्यामुळं आता बाळशास्त्री जांभेकर यांचे छायाचित्र सर्वत्र उपलब्ध होणार आहे.
आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी झाले.प्रकांड पंडित असलेल्या बाळशास्त्रींच्या विद्वत्तचे तेज त्यांच्या चेहर्यावर विलसत होते.हे सारं वास्तव लक्षात घेऊन 1998 मध्ये मुंकुंद बहुलेकर या छायाचित्रकाराने बाळशास्त्रींचे छायाचित्र रेखाटले होते.त्याचं प्रकाशन 1998 मध्येच पुण्यात झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.मुकुंद बहुलेकर यांच्या छायाचित्राचे कौतूक करताना बाळासाहेब ठाकरे यांनी ‘हेच खरे बाळशास्त्री’ अशा शब्दात त्याचां गौरव केला होता.तेव्हा पासून हेच छायाचित्र सर्वत्र वापरले जात आहे. .मात्र 6 जानेवारी रोजी हे छायाचित्र अनेक ठिकाणी मिळत नाही .ही अडचण दूर करण्यासाठी परिषदेने पुन्हा एकदा या छायाचित्राची छपाई केली असून केवळ 10 रूपयांमध्ये हे छायाचित्र उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केलेली आहे.
काल दिवाकर रावते यांच्या हस्ते प्रकाशन झाल्यानंतर आजपासून हे छायाचित्र परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन यांच्याशी संपर्क साधून ( मोबा.9922999671) मिळविता येईल.
काल झालेल्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळेस एस.एम.देशमुख परिषदेचे विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,कार्याध्यक्ष गजानन नाईक,सरचिटमीस अनिल महाजन,कोषाध्यक्ष शरद पाबळे,विभागीय सचिव विजय जोशी,माजी सरचिटणीस यशवंत पवार ,नाशिकचे परिषद प्रतिनिधी बोबडे आदि उपस्थित होते.