बाळशास्त्री जांभेकर यांचे
स्मारक ही लटकले..
मालवण :पत्रकारांच्या जिव्हाळ्याचे कोणतेच प़शन सोडवायचे नाहीत, प्रलंबित ठेवायचे अशीच सरकारची भूमिका आहे की काय असा प़शन पडावा अशा घटना समोर येत आहेत.. पत्रकार पेन्शनचे चॉकलेट दिले पण प़तयक्षात काहीच नाही, पत्रकार संरक्षण कायदाही लटकत ठेवला गेलाय, मजेठिया चा तिढा सुटावा असं सरकारला वाटतच नाही, आता आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारक ही रखडत ठेवलं गेलंय.. त्यामुळे माध्यम जगतात नाराजी आहे.. स्मारक निधाॅरित वेळेनुसार होत नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाने संताप व्यक्त केला आहे.. जिल्हा पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषदेच्या सततच्या पाठपुराव्यामुळं स्मारकासाठी सरकारने निधी मंजूर केला होता..
ओरोस येथील पत्रकार भवनाचे काम संथगतीने सुरू असल्याबाबत व्यक्त केली नाराजी*_
_*मराठी पत्रकार परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पाठपुराव्याने ओरोस येथे सुरू आहे आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाचे बांधकाम*_
_*काही दिवसांपूर्वी जिल्हा पत्रकार संघाने भवनाच्या कामाला भेट दिली असता काम अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याचे आले होते निदर्शनास*_
_*याबाबत पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी पत्राद्वारे व्यक्त केली होती नाराजी*_
_*जिल्हा पत्रकार संघाच्या नाराजीची दखल घेऊन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या !कार्यकारी अभियंत्याना पत्र लिहून काम तातडीने पूर्ण करण्याचे दिले आदेश*_