मुंबई गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर
यांचे नाव द्यावे, रायगड प्रेस क्लबच्या बैठकीत ठराव
बई गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देन्यात यावे असा ठराव रायगड प्रेस क्लब च्या माणगाव येथील जिल्हा कार्यकारिणीच्या बठकीत मंजूर करण्यात आला. यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख व किरण नाईक यांच्या नेतृत्वखाली रायगड प्रेस क्लब चे पदाधिकारी यांनी भेट घेऊन तसे निवेदन देण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले.
रायगड प्रेस क्लब ची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक माणगाव येथील रिव्हर रिसॉर्ट येथे झाली. यात प्रथम कोरोना मध्ये मृत्यू झालेले जेष्ठ दिवंगत पत्रकार।दीपक शिंदे, यांना श्रद्धांजली वाहन्यात आली. नंतर जिल्हा समिती च्या नवनियुक्त पदाधिकारी यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करण्यात आले. याच बरोबर गोरेगाव प्रेस क्लब ने कोरोना आपत्तीत रुग्णवाहिका सेवा दिली. तसेच महाड प्रेस क्लब ने ही कोव्हीड सेंटर द्वारे रुग्णसेवा करीत असल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले.
यावेळी प्रेस क्लब व्यतिरिक्त इतर संघटनेत काम करत असणाऱ्या पत्रकारावर काय निर्णय घ्यावा यावर ठराव झाला असून यात तालुका अध्यक्षांनी निर्णय घेऊन जिल्हा प्रेस क्लब कडे कळवावे असा ठराव झाला. जिल्ह्यला व राज्याला कौतुकास्पद असा कार्यक्रम प्रगतशील शेतकरी सन्मान कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात व्हायला हवा असे स्पष्ट करण्यात आले.
.याशिवाय जिल्हा कार्यकारिणीची पुढील मीटिंग मुरुड येथे होईल असे जाहीर करण्यात आले.
याबरोबरच जिल्हा प्रेस क्लब चा पुढील 17 वा वर्धापनदिन माणगाव येथे होणार असून त्याबाबत नियोजनास सुरुवात करावी असे ठरले आहे.
या जिल्हा कमिटी च्या बैठकिसाठी जिल्हा प्रेस क्लब अध्यक्ष भारत रांजणकर , कार्याध्यक्ष मनोज खांबे, माजी अध्यक्ष अभय आपटे, माजी अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, उपाध्यक्ष प्रशांत गोपाळे, जिल्हा सचिव शशिकांत मोरे,जिल्हा संपर्क प्रमुख भारत गोरेगावकर, जिल्हा संघटक संजय भुवड, जिल्हा सदस्य पदमाकर उभारे, देवा पेरवी, मुकुंद बेबडे, भाई ओव्हाळ, प्रवीण जाधव, राजेंद्र जाधव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कमलेश ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयोजक माणगाव प्रेस क्लब चे अध्यक्ष संतोष सुतार, कार्याध्यक्ष गौतम जाधव , उपाध्यक्ष विश्वास गायकवाड, आरती म्हामूनकर, सचिव हरेश मोरे, खजिनदार सचिन वनारसे, कायदेशीर सल्लागार, डॉ. संजय सोनावणे, प्रमुख संघटक पदमाकर उभारे, प्रमुख सल्लागार उत्तम तांबे, विनोद साबळे, तसेच सदस्य वैभव टेंबे, योगेश ढेपे, पूनम धुमाळ आदी नि योग्य आयोजन केले .
शेवटी जिल्हा प्रेस क्लब च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जिल्हा सदस्य तथा माणगाव प्रेस क्लब चे संघटक पदमाकर उभारे यांनी आभार मानले.
फोटो—
जिल्हा प्रेस क्लब च्या नवनियुक्त अध्यक्ष भारत रांजणकर यांचे स्वागत करताना सर्व सदस्य पदाधिकारी