कर्जत तालुक्यातील दहिवली येथील बालसुधार गृहातून चार बाल गुन्हेगारांनी पलायन केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.बाल सुधारगृहाचे कौलारू छत फोडून हे बाल गुन्हेगार चार दिवसांपूर्वी पसार झाले.त्यांचा शोध घेतला गेला मात्र त्यांचा तपास न लागल्याने मंगऴवारी उशिरा याबाबतची तक्रार कर्जत पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
बाल सुधार गृहात 28 कैदी आहेत.मात्र बालसुधारगृहाची इमारत जुनी असून ती भाडेतत्वावर घेतलेली आङे.तेथे संरक्षक भिंतही नाही.प्रसाधन गृहाचे छत पत्र्याचे आणि कमी उंचीवर आहे तसेच छत कौलारू असल्याने बाल गुन्हेगारांनाही पलायन करणे शक्य होते.यापूर्वी देखील चार बाल गुन्हेगार पळून गेले होते.
बाल सुधारगृहासाठी कर्जत वांजळे येथील जागेचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला असल्याची माहिती बाल सुधारगृहाचे अधीक्षक विजय विध्ने यांनी पत्रकारांना दिली .