बारा चॅनल्सवर कारवाई

0
967

देशात घातपाताची शक्यता लक्षात घेता मुंबई पोलीस कोणतिही रिस्क घ्यायला तयार नाहीये. कारण मुंबई पोलिसांची एक चूक अनेकांच्या जीवावर बेतू शकते हे लक्षात घेता मुंबई पोलीस सर्व प्रकारच्या कारवाई करत आहेत. नुकतीच मुंबई पोलिसांनी अशा काही टीव्ही चॅनल्सवर कारवाई केलीये. ज्या टीव्ही चॅनेल्सवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमुळं मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा जवळपास १२ पेक्षा जास्त चॅनल्सवर मुंबई पोलिसांनी कारवाई केलीये. त्यात विशेष करुन पाकिस्तानी टीव्ही चॅनलचा समावेश आहे.

मुंबई क्राइम ब्रांचच्या समाजसेवा शाखेनं पश्चिम उपनगरातील डिजिटल केबल नेटवर्क मार्फत सुरु असलेल्या अशा आक्षेपार्ह टीव्ही चॅनल्सवर कारवाई केलीये. त्यात पोलिसांनी संबंधीत केबल चालकाच्या कंट्रोल रुममध्ये छापा टाकून बंदी असलेल्या वहिनींचं प्रसारण करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे १० डिकोडर, २ ट्रान्समीटर, १० अॅडॉप्टर, ३ रिमोट, १ सेट टॉप बॉक्स आणि २ एसडी कार्ड जप्त केले.

केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) एक्ट १९९५ अन्वये मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलीये. १२ पेक्षा जास्त आक्षेपार्य टीव्ही चॅन्लस आहेत. ज्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केलीये. ठाणे जिल्ह्यातून इराकमध्ये गेलेल्या उच्च शिक्षित तरुणांना ज्या पद्धतीनं इसिस नावाच्या दहशतवादी संघटनेनं प्रेरित केलं तशाचं पद्धतीनं या चॅनल्समुळं तरुण दहशतवादाकडे प्रेरित होऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन या टीव्ही चॅनेल्सवर कारवाई करण्या़त आलीये. पोलिसांनी ही शक्यता नाकारली आहे. पण एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं या शक्यतेला नाव न सांगण्याच्या अटीवर दुजोरा दिलाय. त्यामुळं तुम्ही देखील आपली मुलं आक्षेपार्ह चॅनल्स बघत तर नाही ना यावर लक्ष ठेवा (.झी-२४ तासच्या सौजन्याने)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here