आणखी एका पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करून त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला आहे.घटना आहे विदर्भातील खापरखेडा येथील.अवैद्य रेती वाहतुकीच्या विरोधात लोकमतचे पत्रकार अऱूण महाजन यांनी बातम्या छापल्या होत्या.पोलिस ठाण्याच्या समोरून हजारो ब्रास वाळूची बेकायदेशीर वाहतूक आणि उत्खनन सुरू असल्याचे त्यांनी बातमीत म्हटले होते.त्यामुळे चिडून पीआयने आपल्याच पोलिस ठाण्यात अरूण महाजन यांच्या विरोधात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल केला आहे.पत्रकारांना विविध पध्दतीनं त्रास द्यायचा,खोटे गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना गप्प करायचे हा प्रयत्न पोलिसच करीत आहेत.खापरखेडा येथील पत्रकार आता यासंदर्भात मुख्यमत्र्यांची भेट घेणार असून संबधित पीआयवर कारवाई करावी अशी मागणी करणार आहेत.नागपूरच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या संदर्भाद निवेदन देण्यात आले आहे.–