बातमीत नाव छापले नाही म्हणून पत्रकारावर हल्ला
पत्रकारावर हल्ला कश्यामुळं होईल याचा नेम नाही.मध्यंतरी अलिबागला एक पत्रकार एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिला नाही म्हणून एका स्थानिक पुढार्यानं त्याला फोन करून त्याला अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली.आज परभणी जिल्हयातील पत्रकार विठ्ठल भिसे या पत्रकारास त्याने बातमीत नाव छापले नाही म्हणून पंचायत समितीचे उपसभापती कोल्हे यांनी मारहाण केली.कोल्हे हे महाशय राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे स्थानिक पुढारी आहेत.याचा अर्थ केवळ विरोधात बातम्या छापल्या एवढेच कारण हल्ल्ल्यांसाठी पुरेसे नाही.नाव छापले नाही,भाषण छापले नाही,कार्यक्र्रमास उपस्थित राहिला नाहीत ,मेळाव्यातील उपस्थितांचा आकडा कमी छापला अशी कारणांवरूनही पत्रकारांवर हल्ले होत आहेत. पाथरीतील या घटनेचा त्रिवार धिक्कार —