बदलापूर ःयेथील पत्रकार महेश जगन्नाथ कामत यांना प्रचंड मारहाण करून त्यांची गाडी जाळण्यात आली आहे.या प्रकरणी पश्चिम बदलापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तुकाराम म्हात्रे आणि बंडया म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.कारला ओव्हरटेक करण्याच्या क्षुल्लक कारणांवरून हा प्रकार घडल्याचं सागितलं जातंय.–