आपण ज्या व्यवसायात असतो त्या व्यवसायाचं पावित्र्य प्रत्येकानं राखलंच पाहिजे.मात्र सर्वच व्यवसायात आता अशीे काही मंडळी आलेली आहे की,त्यांनी व्यवसायाचा धंदा केला आहे.नव्हे त्याचं पावित्र्यच संपवून टाकलं आहे.युक्रेनच्या एका फोटो जर्नालिस्टनं साऱ्या माध्यम जगतावर शरमेनं खाली मान घालण्याची वेळ आणली आहे.
घटना अशी आहे.अमेरिकेची फरिका नावाची एक चित्रपट अभिनेत्री फ्रान्समध्ये आयोजित कान्स फेस्टिवलमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह छायाचित्रकारांना पोझ देत होती.तेवढ्यात एका छायाचित्रकारानं फरिकाकडंं मोर्चा वळवला.तो तिच्या गाऊनमध्ये घुसला आणि फटाफट फोटो काढू लागला.क्षणभर काय होतंय कोणाच्या ध्यानातच आलं नाही.अखेर सुरक्षा रक्षकांनी फोटो जर्नालिस्टला बाहेर काढलं.या प्रकरामुळं सारेच हैराण झाले.या घटनेचा जगभरातील माध्यमांनी धिक्कार केलाय.