पत्रकारांसाठी उपयुक्त ठरेल असे एक न्यूजवायर टुल (https://www.facebook.com/FBNewswire) फेसबुकने विकसित केले आहे,फे सबुकचे सद्स्य फेसबुकवर जी छायाचित्रं,व्हिडीओ,किंवा माहिती शेअर करतात त्याचा वापर पत्रकारांना करता येणार आहे.
फेसबुक यासाठी कॉर्पच्या स्टोरीफुल मिडिया टुलबरोबर काम करीत आहे.त्यामुळं ट्विटरसारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बातम्या आणि व्हिडीओचे कॉपीराईट ओळखणे शक्य होणार आहे.फेसबुकवर बातम्यांना आता कोणत्याही वेळी जास्तीत जास्त वाचक मिळत आहेत.आणि पत्रकार तसेच ग्लोबल मिडिया ऑर्गनायझेशन त्याचा आवशयक भाग आहे असा दावा फ़ेसबुकने केला आहे.एक अब्ज पेक्षा जास्त लोक जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी फेसबुकचा वापर करतात असं फेसबुकचं म्हणणं आहे.फेसबुकनं न्यूजवाय़रचं ट्विटर ( @ FBNewswire) अकाउंटसही उघडलं आहे.