कोट्यवधी रूपयांच्या घोटाळा प्रकरणी पोलिसांना हवा असलेला तत्कालिन उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याला कोर्टाने फरारी घोषित केल्यानंतर त्याने आता पुन्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी न्यायालयात दाखल केला आहे.ठाकूरची तब्बल 118 कोटींीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.1988 ते 2010 या काळात उपजिल्हाधिकारी असताना ठाकूर यांने प्रचंड प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जमा केली होती असा आरोप लाचलुचपत विभागाने केला होता.खंडणी मागितल्याच्या आरोपावरून त्याला 2013 मध्ये निलंबित कऱण्यात आले होते.हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाच नितीश ठाकूर न्यायालयात हजर राहत नसल्याबद्दल न्यायालयाने त्याच्यावर अटक वॉरंट बजावले होते.त्यावेळेस तो नेपाळमध्ये पळून जात असताना त्याला नेपाळच्या सिमेवर पकडण्यात आले होते.त्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता झाली होती मात्र त्यानंतरही तो न्यायालयात हजर राहत नसल्याने त्यााला सहा महिन्यापूर्वी फरारी घोषित कऱण्यात आले होते.आता अटकेच्या भितीने त्याने पुन्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी काल अर्ज केला आहे.त्याच्यावर अजून दोषारोपपत्र दाखल केले गेलेले नाही.