नागपूर ः मिडियावरील कार्पोरट आणि सरकारी दबाव कमी करायचा असेल तर संपादकांच्या नावेच चॅनल्सचे परवाने दिले जावेत थोडक्यात पत्रकारांना चॅनल्स आणि वृत्तपत्राचे काही अँशी तरी मालक बनविले जावेत अशी सूचना पुण्यप्रसून वाजपेयी यांनी केली आहे.ही सूचना प्रत्यक्षात येणारी नसली आणि मालकांकडून या सूचनेला कडाडून विरोध होणार असला तरी त्यातून पत्रकारांना नक्कीच किमान स्थैर्य प्राप्त होईल आणि काही अंशी तरी ठोसपणे काम करता येईल हे खरेच आहे. .या सूचनेबरोबरच पुण्यप्रसून यांनी जी माहिती दिली ती अधिक धक्कादायक आहे.ते म्हणाले,बातमी काढून टाकण्यासाठी पीएम ऑफीसमधून फोन येतात,चुकीच्या बातम्या दाखविण्याचे आदेश दिले जात आहेत..त्यामुळं पत्रकार तणावाखाली काम करीत आहेत.–
काय काय बोलले पुण्यप्रसून वाजपेयी सविस्तर बातमी खाली
मार्च 25, 2018
प्रसिद्ध पत्रकार प्रसून वाजपेयी यांनी आज म्हटले की *मोदी सरकारच्या आगमनानंतर पत्रकारितेची परिस्थिती देशात बदलली आहे. आता संपादकाला कधी फोन येईल हे माहित नसतं. ते म्हणाले की कधी कधी पीएमओ तर कधी कोणत्याही मंत्रालयाकडून फोन येतो. या फोन कॉल्स मधून काय दाखवायचं किंवा कोणत्या बातम्या द्यायच्या याबद्दल आदेश दिला जातो.*
पुण्य प्रसून वाजपेयी पत्रकार आलोक तोमर यांच्या स्मृतीप्रसंगी आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. या व्याख्यानाचे विषय होते “सत्यातीत पत्रकारिता: भारतीय संदर्भ”
पुण्य प्रसून नी सांगितलं की मिडीयावर काही प्रमाणात दबाव आधीच्या सरकार कडून ही असायचा पण पूर्वी फक्त, एखाद्या गोष्टचा तणाव – ताण समाजात पसरू नये म्हणून सामाजिक परिस्थितीचा विचार करून लिखित स्वरूपात तसं सांगितलं जायचं, असे ते म्हणाले. *आता सर्रासपणे फोन येतो की ही बातमी काढून टाका. आता चुकीच्या बातम्या दाखविण्याचेही आदेश दिले जात आहेत.* प्रसून ने सांगितले की जोर्यंत संपादकांच्या नावाने चैनल्सना परवाने उपलब्ध होणार नाहीत, जोपर्यंत पत्रकारांना वृत्तपत्राचे मालक बनवले जाणार नाही तोपर्यंत कॉर्पोरेट दबाव कायम राहील.
त्यांनी स्वतः सांगितलं की *पंतप्रधान कार्यालयातून फोन येतो आणि अधिकारी माहिती विचारतात की दिल्या जाणाऱ्या बातम्या कोठून येतात?* हे अधिकारी डेटा आणि आकड्यांचा स्रोत विचारतात. प्रसून यांनी सांगितले की, अनेकदा सरकारी वेबसाईटवर माहिती असते परंतु सरकारला ती माहितीच नाही.
वाजपेयी म्हणाले की *राजकीय पक्षांच्या काळ्या व्यवसायात बाबा पण सहभागी आहे. बाबा करमुक्त देणग्या घेऊन राजकारण्यांना पुरवतात. त्यांनी सांगितलं की ते लवकरच स्क्रीनवर सर्व गोष्टी उघड करतील.*
संविधान क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात राजदीप सरदेसाई सुद्धा उपस्थित होते. पत्रकारितेमध्ये खोटेपणाची भेसळ होऊ लागलीय. माहिती आणि माहितीची छाननी करण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही. चुकीची माहिती प्रसारमाध्यमांकडे बातमी बनून जाते.
ते म्हणाले की कार्पोरेट प्रभाव आणि टीआरपीचा दबाव यांना दोष देण्याआधी पत्रकारांनी त्यांच्या मनात डोकावलं पाहीजे की सत्याबद्दल तुम्ही किती जागरूग आहात.
परिसंवादामध्ये पत्रकार राम बहादूर राय देखील उपस्थित होते. त्यांनी मीडिया कमिशन निर्मितीची मागणी केली होती. राम बहादूर राय म्हणाले की त्यांच्याकडे माहिती आहे की *काही ठराविक लोकांची मिडियावर कशाप्रकारे एकाधिकारशाही होत आहे.*
पत्रकार उर्मिलेश यांनी म्हटले: *भांडवलशाहीच्या तावडीमध्ये हळूहळू पत्रकारिता अडकत चालली आहे. पत्रकारांना हे माहित नाही की आता स्वातंत्र्य उरले नाही. सर्व स्वातंत्र्य काढून घेतलं गेलंय. ते म्हणाले की पत्रकार अज्ञानातल्या आनंदाने खुष राहून स्वतःचे स्वातंत्र्य गमावत आहेत*