‘प्लेबॉय’ या जगप्रसिद्ध मासिकाचे जनक ह्यू हेफनर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. मासिकातील नग्न छायाचित्रे, सेक्स आणि अशाच काही विषयांवरील लेख, चर्चा, मुलाखती यामुळे हे मासिक तुफान गाजलं. १९५३ मध्ये ह्यू हेफ
नर यांनी ‘प्लेबॉय’ मासिकाची सुरूवात केली. खरंतर त्याकाळात असं मासिक सुरु करणं म्हणजे मोठ्या धाडसाचं म्हणावं लागेल. हे मासिक वादात सापडलं पण जगात कोणत्याही मासिकाला गाठता येणार नाही, इतके खपाचे शिखर प्लेबॉयने गाठले. प्लेबॉयमुळे ह्यू हेफनर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले.