इलेक्टॉनिक मिडिया आणि वेब मिडिया आता अधिक प्रभावी होताना दिसत असला तरी छापील गोष्टींवरचा लोकांचा विश्वास जराही कमी झालेला नाही.त्यामुलं इलेक्टॉनिक मिडियात अग्रेसर असलेल्या कंपन्यांनाही साप्तााहिक सुरू करावे वाटते.जी दैनिकं आहेत त्यांचा खपही वाढत असल्याचे आकडे सतत प्रसिध्द होत असतात.त्यामुळं कोणी काहीही म्हटलं तरी आणखी पन्नास वर्षे तरी प्रिन्ट मिडियाला मरण नाही.एका पाहणीतूनही हेच सत्य बाहेर आलं आहे.
अलिकडच्या काळात वृत्तपत्रांच्या खपात घट झाली आहे. तसेच स्मार्टफोन्सवर बातम्या वाचण्याचे प्रमाणही वाढले आहे. असे असले तरी तरुण वाचक संकेतस्थळे आणि अॅप्सच्या तुलनेत छापील वृत्तपत्र वाचण्यात दुप्पट वेळ खर्च करत असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.
२००६मध्ये इंग्लंडमधील नऊ राष्ट्रीय वृत्तपत्रांच्या १८ ते ३४ वर्षे वयोगटातील वाचकांनी या वृत्तपत्रांच्या छापील आवृत्ती वाचण्यात २१.७ दशलक्ष मिनिटे खर्च केली. परंतु याच वाचकांनी संकेतस्थळे व अॅप्सवरील बातम्या वाचण्यात केवळ ११.९ दशलक्ष मिनिटे घालवली. लंडन विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणात हे चित्र स्पष्ट झाले आहे. हे तरुण वाचक सोमवार ते शुक्रवार या दिवसांत दररोज सरासरी २३ मिनिटे छापील पेपर वाचतात, तर शनिवार व रविवारी याहून अधिक वेळ वाचन करतात. दुसरीकडे संकेतस्थळे किंवा अॅप्सवर ही वृत्तपत्रे दिवसभरात एक मिनिटहून (४६ सेकंद) कमी वेळ वाचली जातात, असे या सर्वेक्षणात समोर आले.