प़सार माध्यमांना जनतेचे शत्रू समजणारे आणि वृत्त पत्रावर बंदी घालण्याची मागणी करणारे एकाच मानसिकतेचे वाहक आहेत.
वॉशिंग्टन – पुन्हा एकदा माध्यमांना लक्ष्य करताना, माध्यमे ही अमेरिकन नागरिकांची शत्रू असल्याचे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी प्रशासनामध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याच्या बातम्या देणारी माध्यमे ‘अप्रामाणिक’ असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज (शनिवार) ट्विट करताना पुन्हा एकदा माध्यमांना लक्ष्य बनविले. ट्रम्प यांनी फ्लोरिया येथे गेल्यानंतर लगेच माध्यमांना लक्ष्य बनविले.
ट्विटमध्ये ट्रम्प यांनी लिहिले आहे, की द फेक न्यूज मिडीया (न्यूयॉर्क टाईम्स, सीएनएन, एनबीसी, एबीसी, सीबीएस) हे फक्त माझेच नाही, तर अमेरिकन नागरिकांचा शत्रू आहे. आमच्या कारभारावर खूप नागरिक खूष आहेत. सर्व प्रशासन अत्यंत सुरळीतपणे कामकाज करत आहे. काही अप्रामाणिक माध्यमे मात्र चुकीचे चित्र दाखवित आहेत, असे ट्रम्प यांनी शुक्रवारी म्हटले होते.