वडवणी ( जिल्हा बीड ) दोन दिवस मराठवाड्यात होतो.वडवणी येथे नव्यानंत उभारण्यात येत असलेल्या तालुका स्तरावरील पत्रकार भवनाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते आणि माझ्या उपस्थितीत झाला.वडवणी-देवडी रोडवर चाळीस बाय चाळीसच्या प्लॉटवर हे पत्रकार भवन होत आहे.एका दानशूर व्यक्तीनं हा प्लॉट मोफत दिलाय तर आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्या आमदार निधीतून दहा लाख दिले आहेत.
या वेळी झालेल्या कार्यक्रमात प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवनाची वास्तू उभी राहिली पाहिजे त्यासाठी शासनाने जागा आणि निधी द्यावा अशी मागणी मी केली.सध्या जिल्हा पत्रकार भवनासाठी सरकार 20 लाखांचा निधी देते.त्याच धर्तीवर तालुका पत्रकार संघासाठी सरकारने किमान 10 लाख रूपयांचा निधी द्यावा असं मला वाटतं.यावेळी बोलताना मी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेत विद्यमान सरकार पत्रकारांच्या प्रश्नांकडं जाणीवपु र्वक दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तवही उपस्थित पत्रकार नागरिकांच्या लक्षात आणून दिले.
आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकारांवर होणाऱ्या हल्लयांपासून पत्रकारांना संरक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी कायदा कऱण्याबाबत सरकार निर्णय़ घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
काय्रक्रम देखणा झाला.या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी कऱण्यासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जानकीराम उजगरे,अनिल वाघमारे आणि अन्य पत्रकारांनी विशेष प्रयत्न केले.आता वडवणी येथे लवकरात लवकर पत्रकार भवनाची वास्तू उभी राहावी आणि तेथून जनहिताचे प्रश्न मार्गी लावण्याचं कार्य सुरू व्हावं एवढीच अपेक्षा