मिडियाच्या नावाने कोणी कितीही बोंबा मारू देत,परंतू मिडिया आपलं काम प्रामाणिकपणे आणि निर्धारानं करीत आहे.हनिप्रित गेली सव्वा महिने पोलिसांना गुंगारा देत होती.मात्र अखेर मिडियानं तिला शोधून काढलं,तिची मुलाखत दाखविली आणि नंतर पोलिसांनी तिला अटक केली.मिडियानं ही कामगिरी केली नसती तर कदाचित हनिप्रित अजूनही पोलिसांना मिळाली नसती.स्वतंत्र,निःपक्ष मिडिया ही देशातली आजची गरज आहे .-
बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक कन्या हनीप्रीतचा हरियाणा पोलीस दिवस-रात्र शोध घेत होते. नेपाळसह देशाच्या अनेक राज्यांमध्ये पोलिसांनी छापे मापले पण कुठेही हनीप्रीत सापडली नाही. सगळीकडून वाढणाऱ्या दबावामुळे शेवटी हनीप्रीत माध्यमांसमोर आली आणि हरियाणा पोलिसांनी तिला अटक केली. आज पंचकुला कोर्टासमोर हनीप्रीतला हजर केलं जाणार आहे.
पोलिसांच्या चौकशीत हनीप्रीतने दावा केला आहे की, ती नेपाळला गेली नव्हती. पंजाबच्या भटिंडामधील एका डेरा समर्थकाच्या घरात मी लपली होती, असा दावा हनीप्रीतने केला आहे. हरियाणा पोलिसांना सुरूवातीच्या चौकशीत यापेक्षा जास्त माहिती मिळाली नाही. हनीप्रीत भटिंडामध्ये असल्याची माहिती पोलिसांना सुखदीप नावाच्या एका महिलेकडून समजली होती. सुखदीप डेऱ्याची अनुयायी आहे. तिचं कुटुंब डेऱ्यामध्येच राहतं. भटिंडामध्ये सुखदीपची जमीन आणि घर आहे. त्याठिकाणी सुखदीप 2 सप्टेंबरनंतर राहायला गेली होती. हनीप्रीतची पंचकुलाच्या चंडीमंदिर पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 5 तास सुनावणी झाली. पंचकुलाचे पोलीस अधिकारी एएस चावला यांनी हनीप्रीतची चौकशी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. चौकशीच्या सुरूवातीपासून हनीप्रीत जास्त माहिती देत नाहीये. पण तिची चौकशी सुरूच राहणार आहे. कोर्टात हजर केल्यानंतर हनीप्रीतला पोलीस रिमांडमध्ये घेतलं जाणार आहे. हनीप्रीत गेल्या काही दिवसांपासून आपल्याकडेच राहत होती, असं हनीप्रीतबरोबर अटक केलेल्या महिलाने चौकशीदरम्यान सांगितलं आहे.
हनीप्रीत 2 सप्टेंबरनंतर भटिंडामध्ये आली होती. सुत्रांच्या माहितीनुसार, हनीप्रीतला पंजाबच्या जीरकपूर पटियाला रोडवर हरियाणा पोलिसांनी अटक केली. गेल्या काही दिवसांमध्ये हनीप्रीतने अनेक काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधला होता, अशी माहितीही सुत्रांकडून मिळते आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, हनीप्रीतने भेट घेतलेल्या काँग्रेस नेत्यांनी तिला पोलिसांपासून वाचविण्यात मदत केली होती. पुढे काय करायचं? कुठे जायचं ? याबद्दलचं मार्गदर्शन काँग्रेस नेते तिला करत असल्याचं समजतं आहे.
हरियाणा पोलीस गेल्या एक महिन्यापासून हनीप्रीतचा शोध घेत होते. पोलिसांनी नेपाळ, राजस्थान, बिहार, दिल्ली आणि हरियाणातील अनेक ठिकाणी छापेमारी केली. पंचकुला कोर्टाने 25 सप्टेंबर रोजी हनीप्रीत, आदित्य इन्सा आणि पवन इन्सा विरूद्ध अटक वॉरंट जारी केला होता
लोकमतच्या बातमीच्या आधारे