पत्रकारांवरील हल्लयाच्या घटनांमध्ये देशभर वाढ होत आहे.इंदोरची ताजी घटना आहे.शनिारी रात्री दोन प्रेस फोटोग्राफऱ आणि पार्किंगवाल्यामध्ये गाडी लावण्याच्या कारणांवरून किरकोळ बाचाबाची झाली.पार्किगवाल्याने पोलिसात तक्रार दिली.पोलिसांनी तक्रारीवरून फोटोग्राफरला बोलावून त्यांना मारहाण केली.ही बातमी शहरातील अन्य फत्रकारांना समजली तेव्हा ते जीआरपी पोलिस ठाण्यात आले.त्यंानी घोषणाबाजी सुरू केली.त्यामुळे चिडलेल्या खाकी वर्दीवाल्यांनी पत्रकारांवर लाठ्या-काठ्या चालवायला सुरूवात केली.त्यात सहा पत्रकार गंभीर जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.या प्रकरणाची तक्रार घ्यायलाही अगोदर पोलिस तयार नव्हते मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक घटनास्थळावर आल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेतली.या प्रखरणाची गृह मंत्री बाबूलाल गौर यांनी तातडीने दखल घेत तीन कॉन्स्टेबलला सस्पेंड केलं आहे.या घटनेचा इंदोर प्रेस क्लबनं निषेध केलाय.जखमी सहा पत्रकारांपैकी तिघांची प्रकृत्ती चिंताजनक असल्याचे समजते.
इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट ची तातडीची बेठक इंदोरमध्ये झाली.त्यात घटनेचा निषेध केला गेलाय.