महाराष्ट्रात पोलिसांची अरेरावी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.औरंगाबाद येथील आयबीएनचे पत्रकार सिध्दार्थ गोदाम यांनाही काल असा अनुभव आलाय.कोण्या मत्र्याचा सत्कार होता.त्याची मिरवणूक निघाली होती.त्यानं वाहतुकीस अडथळा झाला.त्यात काही शाळकरी मुली अडकल्या.तेथे उपस्थित असलेल्या पत्रकार गोदाम यांनी पोलिस निरिक्षक सय्यद सिद्दीकी यांना वाहतूक सुरळीत कऱण्याची विनती केली.ज्या योगे त्या मुली शाळेत जाऊ शकतील .यावर खाकी वर्दीतल्या सिद्दीकी यानी काय करावं,गोदाम यांच्यावर शासकीय कामात अडथला आणला म्हणून गुन्हा दाखल केला .पत्रकारांना नमोहरण करण्याची ही सोपी पध्दत आहे असे पोलिसांना वाटते मात्र पोलिसांच्या अशा अरेरावीला ना गोदाम भीक घालतील,ना राज्यातला कोणताही पत्रकार भीक घालेल.
महाराष्ट्रातील सर्व पत्रकार गोदाम यांच्या बरोबर आहेत.औंरगाबादचे पत्रकार जो निर्णय़ घेतील त्यांच्याबरोबर महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषद या घटनेचा धिक्कार करीत आहे.