पेड न्यूज देताय…सावधान

0
826

 पेड न्यूज हा निवडणूक प्रक्रियेतील गुन्हा असून, हा प्रकार आढळल्यास संबंधित उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार आहे. त्यामुळे हा नियम निवडणुकीमध्ये एकप्रकारचा धाक निर्माण करेल,’ असा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी व्यक्त केला आहे.

विधी आयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, ‘निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्षांच्या खर्चाविषयी नियम करणे, ही गरज आहे. मात्र, असा नियम नसल्यामुळे सर्व खर्चाचा ताण उमेदवारांवर पडत असतो.

तसेच, ‘पेड न्यूज’विषयी कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अधिकार आहेत का, या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक येते. मात्र, निवडणुकीमध्ये ‘पेड न्यूज’चे प्रकरण पुढे आल्यास त्यावर कारवाई निश्चित होईल.’ निवडणुकीच्या काळातील सरकारी जाहिराती ‘पेड न्यूज’ म्हणून गणल्या जात नाहीत, यावरही संपत यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच, उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरच निवडणूक खर्चाचा हिशेब करण्यात येतो. मात्र, बहुतांश उमेदवार आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर खर्च करत असतात, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here