पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्यामुळे पत्रकार पेन्शनचा विषय मार्गी लागण्याची शक्यता असून राज्यात पेन्शन पात्र किती पत्रकार आहेत याची माहिती जमा करायला माहिती आणि जनसंपर्क विभागाने सुरूवात केली आहे.,प्रत्येक जिल्हयातील माहिती अधिकार्यांच्या मार्फत त्या त्या जिल्हयात साठी ओलांडलेले किती पत्रकार आहेत याची माहिती जमा केली जात आहे.अशा पत्रकारांकडून त्याची संपूर्ण माहिती असलेला एक फॉर्म भरून घेतला जात असून ही माहिती 3 एप्रिल पर्यत जमा करायची आहे.त्यामुळे चालू अधिवेशनात पेन्शनचा विषय मार्गी लागेल अशी शक्यता आहे..–