पेण-दि.22- (प्रतिनिधी)-पेण तालुक्यासह संपुर्ण रायगड जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडनाऱ्या रायगड प्रेस क्लब सलंग्न पेण प्रेस क्लब तर्फे व प्लँटीनम हॉस्पिटल, महात्मा गांधी वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.22 फेब्रुवारी 2015 रोजी महात्मा गांधी वाचनालय-पेण येथे मोफत ह्रदयविकार तपासणी शिबीराचे आयोजन केले होते या शिबिरास परीसरातील 93 नागरीकांनी तपासणी करुनघेतली. सदर शिबीराचे उदघाटन जेष्ठ पत्रकार अण्णा वैरागी, य.भी.तेरवाडकर, अण्णा वनगे अादि मान्यवरांचे हस्ते करण्यात अाले
या शिबीरामध्ये प्लॅटीनम हाॅस्पीटलचे डाॅ.सुरज पाटील, डाॅ. अरविंद मिश्रा, डाॅ.धर्मेद्र विश्वकर्मा, सचिन म्हात्रे,वैशाली म्हात्रे अादि डाॅक्टरांचे पथकाने ह्रदयविकार, एंजीओग्राफी, एंजीओप्लास्टी, बायपास, ह्रदय शस्त्रक्रिया, मुत्रपिंड (किडनी) आजार इत्यादी सह अनेक आजारांची मोफत तपासणी केली. यावेळी 67 रुग्न्नाची इसीजी करण्यात आली. त्यामध्ये एंजिओप्लास्टी-1, इंजिओग्राफी-4, सीएजी-4, हर्निया-1, एमव्हीआर-1 ह्या रुग्णास पुढील उपचार व औषधोपचारासाठी मुंबई येथील प्लॅटीनम हाॅस्पिटल मुलुड येथे नेण्यात येणार अाहे.सदर शिबिरास पेण शहरासह दादर, कळवे, गडब, मळेघर ,बोरी, सावरसई, रामवाडी, हमरापुर, पाटणेश्र्वर, जिते अादि गावातील नागरीकांनी तपासणी करुन घेतली .
या वेळी पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, विजय मोकल, सुनिल पाटील, संतोष पाटील, प्रमोद मोकल, संदिप म्हात्रे, सूर्यकांत पाटील, अण्णा वैरागी, य.भी.तेरवाडकर, प्रदीप मोकल व सर्व सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रमा प्रसंगी माणगाव येथील पत्रकार प्रकाश काटदरे व कॉ.गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली वाहन्यात आली….