सुमारे ७५८ कोटी रूपयांच्या घोटाळ्याने चर्चेत आलेली पेण अर्बन बँक दिवाळखोर म्हणून घोषित करण्याच्या सहकार आयुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली व सुनावणी १६ जूनपर्यंत तहकूब केली. यामुळे दिवाळखोरीची प्रक्रिया तूर्तास करता येणार नसल्याने बँकेच्या १ लाख ९५ हजार ७७५ ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वीच सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांनी या बँकेसंदर्भातील हा निर्णय जाहीर केला. याविरोधात पेण अर्बन बँक संघर्ष समितीने न्यायालयात धाव घेतली. सुट्टीकालीन न्या. रमेश धानुका व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.
या घोटाळ्याविषयी न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. तसेच या प्रकरणाचा तपासही सुरू आहे. तसेच ही बँक दिवाळखोरीत न काढता तिला पुनर्जीवित करता येऊ शकते का, यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. असे असताना ही बँक दिवाळखोरीत कशी