दार्रिद्÷य आणि उपासमार दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ काल पेण तालुक्यातील वाक्रुळ येथे आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पाटील यांच्या हस्ते काही आदिवासींना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
पेण तालुक्यात 101 रास्त धान्य दुकानं असून शहरी भागात 16 हजार 542 तर ग्रामीण भागात 49 हजार 64 लाभार्थी आहेत.या सर्वांना सदरच्या योजनेचा लाभ होणार आहे.या योजनेअंतर्गत प्रती माणसी 2 रूपये किलो गहू,3 रूपये किलो तांदूळ,1 रूपया किलो बाजरी,ज्वारी देण्यात येणार आहे.
पेणच्या रास्त भाव दुकानदारांनी ही योजना गरिबांपर्यत पोहचवावी असे आवाहन याप्रसंगी आमदार धैर्यशील पाटील यांनी केले.या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृतीची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.