पेड न्यूजबाबत निवडणूक आयोगाची भूमिका कठोर

0
921

पेड न्यूजच्या बाबतीत निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे.यासंबंधात पत्रकारांकडून सहकार्य मिळावे यासाठी उत्तर प्रदेशात लखनऊ मध्ये निवडणूक आयोगाने पत्रकारांसाठी नुकत्याच एका कार्यशाळेचे आयोजन केले होते.

निवडणूक आयोगाच्यावतीने निवडणूक काळात जिल्हा आणि राज्यस्तरावर पेडन्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण समित्या गठित कऱण्यात येत आहेत.यात प्रिन्ट आणि इलेक्टॉनिक मिडियाबरोबरच सोशल मिडियावरही निवडणूक आय़ोग लक्ष ठेवणार आहे.पुढाऱ्यांची वृत्तपत्रे आणि पत्रकार संघटनांवरही नियंत्रण ठेवले जाणार आहे.

पोस्टरवर प्रकाशकाचे नाव किंवा सविस्तर माहिती दिलेली नसेल तर कलम 127 ए अंतर्गत निवडणूक आयोग कारवाई क रेल.निवडणुकीस 48 तास उरलेले असताना विशिष्ट उमेदवार पुढे आहे,त्याचा पराभव नक्की आहे,तो जिंकणारच अशा बातम्या देणाऱ्यावर आर बी ऍक्टच्या 126 बी नुसार कारवाई करण्यात येईल.प्रेस कौन्सिलच्या गाईडलाईननुसारच पेड न्यूज प्रकऱणी आयोग कारवाई कऱणार असल्याने माध्यम समुहांना याची नोंद द्यावीच लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here