प्रिन्ट आणि इलेक्टॉनिक मिडियातील पेड न्यूज वर प्रतिबंध लावण्यासाठी सुप्रिम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील एका बेंच पुढे या याचिकेवर शुक्रवार दिनाक 11 एप्रिल रोजी सुनावणी होईल.
सुप्रिम कोर्टातील एका वकिलाने ही याचिका दाखल केली असून त्यात भारतीय निवडणूक आयोग आणि पाच विभागीय मिडिया घराण्यांना प्रतिवादी बनविण्यात आलंय.पेड न्यूज् जाहिरातीच्या माध्यमातून जनतेला विशिष्ठ व्यक्ती किंवा पक्षाला मतदान करण्यास प्रेरित केले जाते असे याचिेकेत म्हटले आहे.जे मिडिया हाऊसेस अशा उद्योगात आहेत त्याच्यावर कारवाई कऱण्याची मागणी देखील करण्यात आली आङे.