अर्जुन पुरस्कार,राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार,ध्यानचंद पुरस्कार,शिवछत्रपती पुरस्कार,हिंद केसरी,रूस्तम-ए-हिंद,भारत केसरी,महान भारत कसेरी हे पुरस्कार प्राप्त खेळाडूंन आता शासकीय विश्रामगृहात शासकीय दराने आरक्षण मिळणार आहे.सरकारने चांगला निर्णय घेतला आहे.
15 जानेवारी 2011 रोजी सरकारने काढलेल्या अद्यादेशानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,व अपंग गुणवंत कामगार पुरस्कार ज्यांना मिळाले आहेत त्यंानाही शासकीय विश्रामगृहात आरक्षण मिळाले आहे.
राहिले फक्त शेतकरी. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार कृषी भूषण,कृषी रत्न,कृषी मित्र यासारखे विविध पुरस्कार दर वर्षी देते.मात्र कृषी पुरस्कार ज्या शेतकऱ्यांना सरकार देते त्यांना कसलीच सवलत नाही.त्यांना बसमध्ये मोफत प्रवास मिळावा अशी मागणी होती ती देखील मान्य केली जात नाही.शेतकऱ्यांनी शासकीय विश्रामगृहात राहाता कामा नये असा काही नियम नाही.त्यामुळे खेळाडू किंवा दलित मित्र पुरस्कार मिळालेल्या पुरस्कार्थींना ज्या प्रमाणे शासकीय विश्रामगृहात आरक्षणाची सोय केली गेली आहे त्याच प्रकारे शेतकऱ्यांसाठीही ही व्यवस्था झाली पाहिजे अशी पुरस्कार प्रापत् शेतकऱ्यांची मागणी आहे.देशाचे कृषी मंत्री शरद पवार यांनी याबाबतचा निर्णय घेण्यास राज्य सरकारला सांगावे अशी अपेक्षा आहे.