पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील महिला पत्रकार श्रद्धा जोशी आणि त्यांचे पती आरटीआय कार्यकर्ते प्रवीण जोशी यांना काही गावगुंडांनी जीवे मारण्याची धमकी दिली.ही बातमी पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांना समजताच जोशी दाम्पत्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.या घटनेचा निषेध करतानाच तालुका पत्रकार संघानं आज तहसिलदार सचिन गिरी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांची भेट घेऊन महिला पत्रकारास धमकी देणार्या गावगुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघ तसेच पुणे जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही या घटनेचा निषेध केला आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुनील लोणकर यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ अधिकार्यांना भेटले.–
(Visited 113 time, 1 visit today)