“पुष्पा” हा चित्रपट मला आवडला नाही हे मी यापुर्वीच स्पष्ट केलं आहे. इतर कोणाला तो आवडला असेल तर त्याबाबत माझी तक्रार नाही.. आवडीनिवडी भिन्न असू शकतात.. त्यावर बंधनं कोणी आणत नाही किंवा आणू ही शकत नाही..या मतांचा मी आहे..
माझा आक्षेप या चित्रपटात गुनहेगारीचं उदात्तीकरण करण्याला आहे.. “झुकुंगा नही” म्हणत वरिष्ठ पोलीस अधिकरयाला नागडं करणारा पुष्पा मला मान्य नाही.. यावर काही लोकांचं म्हणणं असंय की,” लाचखोर अधिकरयाला अशीच अद्दल घडविली पाहिजे..” क्षणभर हा युक्तीवाद मान्य करा पण ही अद्ल कोण घडवतोय? जंगलातील मौल्यवान चंदन विकून गबर झालेला तष्कर.. स्वतः गुन्हेगार असलेली व्यक्ती भ्रष्ट पोलीस अधिकरयाला नागडा कसं करू शकते…,? त्याचं समर्थन तरी कुठल्या तोंडानं करायचं? एखाद्या प्रमाणिक व्यक्तीनं असं केलं असतं तर एकवेळ त्याचं समर्थन शक्य होतं.. पुष्पाबाबत तसं नाही..एक गुन्हेगार सांगतोय समोरचा अधिकारी भ्रष्ट आहे.. आणि आपण त्यावर टाळ्या वाजवतो.. गंमत आहे..
अन्य एका मित्राचा आक्षेप असा की, “अन्य असे असंख्य सिनेमे आहेत की त्यातही गुनहेगारीचं समर्थन केलेलं दाखविलं आहे..त्यावर तुम्ही कधी बोलले नाही” .. एक तर फार सिनेमे पहायला मला वेळ मिळत नाही.. दुसरी गोष्ट अशी की, अनेक चित्रपट असे आहेत की, चित्रपटाच्या शेवटी सत्याचा असत्यावर विजय दाखविला आहे.. आपल्याकडे जशी म्हण आहे, “देर है लेकिन अंधेर नाही.” सिनेमात का होईन गुन्हेगाराचा खातमा झाल्याचा आनंद सामान्य प्रेक्षकांना होतो आणि ते आनंदाने टाळ्या वाजवतात.. पुष्पात फक्त अंधेरच आहे.. म्हणजे सारं करून सवरून एका गुन्हेगाराचा विजय दाखविला गेला आहे.. प्रत्यक्ष जीवनातही नंगानाच करणारयांना तुरूंगाची हवा खावी लागते.. अधिकरयाला नागडं करून इथं पुष्पा बोहल्यावर चढतो..यातून जिसकी काठी उसकी भैस हा संदेश गेला, गुन्हेगारीवृती वरचढ आहेत हे जाणवू लागले तर बेबंदशाही माजेल.. लहान मुलांवर त्याचे कोणते आणि कसे परिणाम होतील याचा विचार अंधपणे पुष्पांचं समर्थन करणारांनी करावा..ही विनंती..
पुष्पाचे जे कोणी निर्माते, दिग्दर्शक आहेत त्यांची माझी ओळख असण्याचं कारण नाही.. त्यामुळे माझा विरोध व्यक्तीव्देषातून आहे असे कोणी समजू नये.. “अन्य अशाच सिनेमांना का विरोध केला नाही”? या सवालातून हा भाव दिसतो म्हणून खुलासा…
मला करवीर तालुक्यातील नागाव येथील शाळेला विशेष धन्यवाद द्यायचे आहेत.. माझ्या वरील विवेचनाचा धागा पकडत त्यांनी आपल्या सुविचार फलकावर कोण, कुठला हा पुष्पा? तो कसा आमचा आदर्श होऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित केला आहे.. छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग हेच आमचे आदर्श आहेत असे शाळेनं ठणकावून सांगितलं आहे.. मुलांना अशा वहायरसपासुन दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणारया नागाव विद्यालयाचे अनुकरण सर्वत्र व्हायला पाहिजे.. एवढंच..