पुण्यात पत्रकारास मारहाण
पुणे :टाइम्स ऑफ इंडिया चे पत्रकार जिब़ान नाझीर दार यांच्यावर गुरूवारी दोघा तिघांनी हल्ला केल्याची बातमी बीबीसी डॉट. कॉमने दिली आहे. काम आटोपून रात्री १०.३० वाजता घरी परत जात असताना टिळक रोडवर हा प्रकार घडला. जिब़ान दार यांनी दिलेल्या माहितीनुसार “मी टिळक रोडवर सिग्नलवर थांबलो असताना पाठीमागून दोघेजण सारखे हॅानॅ वाजवत होते.. माझ्या गाडीचे पासिंग हिमाचलचे असल्याने ए हिमाचली पुढे चल असं ते बोलत होते.. मी हिमाचलचा नाही काश्मीरचा आहे.. पत्रकार आहे म्हटल्यावर त्यांनी माझी गाडी अडविली आणि काश्मिरमधये जाऊन पत्रकारिता कर असे म्हणत त्यांनी मारहाण करायला सुरूवात केली..
माझा फोन हिसकावण्याचा प्रयत्न झाला. मी माझ्या काही सहकाऱ्यांना फोन केला आणि पाच मिनिटात पोलीस आले. मी पोलिसात रीतसर तक्रार केली, तेवढ्यात पोलीस दोघांना घेऊन आले. त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय पण होते. त्यांनी माझी माफी मागत ‘परत असं काही करणार नाही’ असं लिहून दिलं,” असं जिब्रान यांनी बीबीसी मराठीला सांगितलं
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या हल्लयाचा निषेध करीत आहे..