टीव्हीवरील अँकरला नोकरी सोडावी लागली तर तो बहुतेक वेळा मिडियातून हद्दपार होतो.असे अँकर किंवा संपादक मग एकतर वेगवेगळ्या पक्षाच्या आयटी सेलचे प्रभारी होऊन पक्षाचा प्रचार करतात किंवा पक्षाचे प्रवक्ते बनून पक्षाची तरफदारी करीत राहतात.इथं ज्यांना संधी मिळत नाही ते एखादे युट्यूब चॅनल काढून आपण पत्रकारितेत आहोत हे दाखवत राहतात.मात्र काही खऱोखरच जे चांगले अँकर किंवा संपादक आहेत त्यांच्याकडं संधी चालत येते.पुण्यप्रसून वाजपेयी अशा नशिबवान अँकर पैकी एक आहेत.असं बोललं जातंय की, रामदेव बाबांच्या तक्रारी नंतर पुण्यप्रसून वाजपेयी यांना आजतक सोडावे लागले.मात्र लगेच त्याना एबीपी न्यूजमध्ये संधी मिळाली असून ते लवकरच तिकडे रूजू होणार आहेत..हिंदी किवा इंग्रजीमध्ये अनेक चॅनल्स आहेत.तिकडे अनेक संधी असतात.मराठीत मात्र चार-पाचच चॅनल्स असल्यानं मर्यादा येतात.त्यामुळं कोणत्याही कारणानं चॅनल सोडावं लागलं की,नव्यानं संधी मिळणं कठीण होऊन बसतं.