पुणे – पुणे जिल्हा पत्रकार संघाची आज बैठक पुण्यातील संघाच्या कार्यालयात पार पडली.बैठकीत परिषदेने केलेल्या आवाहनानुसार जिल्हयातील सर्वच तालुक्यात 3 डिसेंबर रोजी पत्रकार आरोगय तपासणी शिबिरं घेण्याचं नक्की केलं गेलं.तसेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात विभागीय पत्रकार कार्यशाळा घेण्याचं नक्की करण्यात आलं.त्याचबरोबर वसंत काणे यांच्या नावाने एक तसेच अन्य दोन पत्रकारांना पुरस्कारांनी सन्मानित करण्याचा निर्णय़ही घेतला गेला.पत्रकार प्रशिक्षण श्ििबराच्या निमित्तानं एक स्मरणिका प्रसिध्द करण्याचंही नक्की झालं आहे.
स्मरणिकेची जबाबदारी श्री,सुर्वे आणि बापूसाहेब गोरे याच्यावर सोपविण्यात आली आङे.याच बैठकीत पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ यांनी परिषदेचे अधिवेशन पिंपरी-चिंचवडला घेण्याची विनंती करणारं पत्र यावेळी परिषदेकडं दिलं आहे.परिषदेच्या बैठकीत पिंपरी -चिंचवडच्या पत्रावर चर्चा करून निर्णय़ घेण्यात येईल अशी माहिती यावेळी एस.एम.देशमुख यांनी दिली .सदस्यांना ओळखपत्र देण्याचा तसेच पदाधिकाऱ्यांनी 10 डिसेंबरच्या आत पुणे जिल्हयाचा दौराकरून संघटन अधिक मजबूत कऱण्याचाही निर्णय़ घेण्यात आला आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष शरद पाभळे होते.यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज,परिषदेचे प्रसिध्दी प्रमुख श्रीराम कुमठेकर,परिषदेचे विभागीय सचिव डी.के.वळसे पाटील,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री.सुर्वे,श्री.सुनील वाळुंज.तसेच शहराध्यक्ष राजेंद्र कापसे यांच्यासह 25 पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.