पुणे आरटीओ कार्यालयात पुढारीचे पत्रकार लक्ष्मण खोत वार्ताक॔नासाठी गेले होते. बातमीसाठी आरटीओ आवारातील काही फोटो काढत असताना, तेथे उपस्थित असलेल्या एंजटांचा जमाव एकत्र ऐवून त्यांनी पत्रकार लक्ष्मण खोत आणि फोटोग्राफर यशवंत कांबळे यांना घेरून शिविगाळ केली. त्यामधील जितू नावाचा एजंट आणि दुसरा एक अज्ञात एजंटाने खोत यांना धक्काबुक्की शिविगाळ देत मारहाण करायला सुरवात केली..
आरटीओ कार्यालयात नागरिकांची फसवणूक करणार्या एजंटाची ही दादागिरीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांची लूट करणार्या एजंटांची मजल आता पत्रकारांना मारहाण करण्यापर्यंत गेली आहे….बंड गार्डन पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.