परभणी जिल्हयातील पाथरी येथील लोकमतचे पत्रकार विठ्टल मिसे यांच्याविरोधात पाथरी पोलिसात खंडणीचा खोटा गुहा दाखल कऱण्यात आला आहे.पाथरी शहरातील आयटीआयच्या इमारतीचे निकृष्ट बांधकाम केले गेले आहे.त्याविरोधात 24 आणि 30 नोव्हेंबरच्या अंकात बातम्या छापून आल्या होत्या.त्याचा राग मनात धरून बांधकाम विभागाच्या उपअभियंता मीनाक्षी मुदीराज यांनी पत्रकारावर गुन्हा दाखल केला आहे.विरोधात बातमी आली की,विविध पध्दतीनं पत्रकाराचा आवाज बंद कऱण्याचा हा राज्यातील 24 वा प्रकार आहे.–