गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला पेण तालुक्यातील खारेपाटातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रायगडमधील पत्रकारांनी हाती घेतला असून त्यासाठी जनमत संघटीत कऱण्यासाठी आज शिर्की -बोरी येथे पाणी परिषदेचे आयोजन कऱण्यात आले होते.यावेळी उपस्थित पाच हजारांवर नागरिकांनी परिसरातील 45 गावं आणि 12 आदिवासी वाड्यांना पाणी मिळत नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.जनतेचा हा आवाज बुलंद कऱण्यासाठी आता पत्रकारांच्या पुढाकाराने येत्या 4 डिसेंबर रोजी शिर्की ते अलिबाग असा लाँगमार्च काढण्यात येणार असून तेथे जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले जाणार आहे.पाणी पुरवठा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन त्यांनाही पाण्याच्या प्रश्नांबद्दल अवगत केले जाणार आहे.आज झालेल्या मेळाव्यात पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,विजय पवार यांनी मार्गदर्शन केले .संतोष पेरणे , विजय मोकल,देवा पेरवी यांनी नियोजन केले होते.पत्रकारांनी हा प्रश्न हाती घेतल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास जनतेला वाटतो..—