पाटबंधारे कार्यालयावर जप्ती

0
1296
अलिबागः 5 कोटी 65 लाखांची रॉयल्टी न भरल्याने पेण तहसिलदारांनी पाटबंधारे विभागाच्या  कोलाड येथील कार्यालयावर आज जप्तीची कारवाई केली आहे.
रायगड जिल्हयातील बाळगंगा धरणाचे काम पाटबंधारे विभागाच्या कोलाड कार्यालयाने केले होते.त्यासाठी माती भरावाचे गौण खनिज स्वामीत्व पाटबंधारे विभागाकडे होते.त्यानुसार पाटबंधारे विभागानं 8 कोटींची रॉयल्टी यापुर्वीच भरली होती.मात्र महालेखाकार नागपूर यांनी बाळगंगा प्रकल्पाबाबतचे लेखा परिक्षण केले असता माती भरावाचे वाढीव रॉयल्टीचे 5 कोटी 87 लाख रूपये पाटबंधारे कार्यालय देणे लागत होते.पेण तहसिलदार अजय पाटणे यांनी वारंवार यासंदर्भाथ सूचना करूनही रॉटल्टी न भरल्याने ही कारवाई कऱण्यात आली आहे.या कारवाईत होंडा कार,भारतीय स्टेट बँक खाते,13 संगणक,कार्यालयातील खुर्च्या जप्त करण्यात आल्याने रायगड जिल्हयात हा विषय चर्चेचा बनला आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here