पाकिस्तानमधील जियो टीव्हीचे पत्रकार हामिद मीर यांच्यावरील हल्लयाचे प्रकरण ताजेच असताना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियांवाली जिल्हयात अज्ञात बंदुकधाऱ्यांनी स्थानिक टीव्हीचे समा टीव्हीचे पत्रकार शहजाद इकबाल याची गाळ्या घालून हत्त्या केली गेली.पत्रकार शङजाद यांना मारेकऱ्यांनी पकडले आणि त्यांच्यावर दणदण गोळया चालवल्या.त्यांना जखमीअवस्थे रूगणलयात नेले गेले तेथे त्यांना मृत जाहीर करण्यात आले.
हा हल्ला कोणी आणि कशासाठी केलाय ते अध्याप स्पष्ट झाले नाही.पत्रकारांना पाकिस्तानमध्ेय सातत्यानं टार्गेट केलं जात असल्यानं पाकिस्तान हा देश पत्रकारांसाठी सर्वात धोकादायक देश ठरला आहे.