पाऊस आला, पण पाणी टंचाई कायम

0
1200

मंगळवारच्या रात्री,आणि बुधवारी सकाळी रायगड जिल्हयाच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी तब्बल एक महिना उशिरा आलेल्या या पावसाने जिल्हयातील पाणी टंचाईचे संकट कमी झालेले नाही,धरण क्षेत्रात पावसाचा जोर नसल्याने पाणी टंचाईची स्थिती फारशी बदललेली नाही.जिल्हयातील बहुतेक धरणांनी तळ गाठला असून जिल्हयात 20 टक्के पाणी साठी देखील उपलब्ध नाही.

पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्पातील जलसाठा साठवण क्षमता 144.98 दशलक्ष घनमिटर असली तरी तेथे प्रत्यक्षात 66.711 दशलक्ष घनमिटर साठा शिल्लक आहे.माणगाव तालुक्यातील पन्हळघर लघु पाटबंधारे प्रकल्पाची साठवण क्षमता 3.15 दशलक्ष घनमिटर असताना तेथे 0.929 घनमिटरच पाणी साठा शिल्लक आहे.अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागाला पाणी पुरवठा करणारे तिनविरा धरण कोरडे पडल्याने या भागातील अनेक गावांसमोर पाणी प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हयातील बहुतेक गावतळी,विहिरी कोरड्या पड्‌ल्या आहेत.
जिल्हयातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी हेटवणे धरणातील पाणी घेतले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली.
पावसाअभावी 9 ते 10 हजार हेक्टरातील पिके गेली असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठेच संकट उभे राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here