“जाणते राजे” शरद पवार यांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कायर्क्रम बोलताना मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या वेळेस झालेल्या संघषार्ची आठवण करून देत खपली काढण्याचा प्रयत्न केला आहे. मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार करताना संघषर् झाला पण तसा संघषर् नंतर विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या वेळेस झालेला नाही.पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या वेळेसही विरोध झालेला नाही.उलट सवार्ंनीच त्यास पाठिंबा दिला.अशा स्थितीतही शरद पवार ” नामविस्ताराबाबत चिंता वाटते” असं म्हणत असतील तर त्यांच्या डोक्यात काय चाललंय याचा अंदाज घेतला गेला पाहिजे.
नामविस्ताराबाबत चिंता वाटते असं म्हणणारे शरद पवार लगेच सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकराचं नाव देण्यासाटी प्रयत्न करणअयाचं सूचवतात.ही जबाबदारी स्वतः घेण्याची त्यांची तयारी नाही.त्यासाठी सोलापूरकरांनी प्रयत्न करावेत,विद्यापीठात जाऊन त्यासाठी आग्रह करावा(की गोँधळ घालावा )
असा सल्ला त्यांनी दिला आहे.खरं तर शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांनी एकत्र बसावं आणि निणर्य घ्यावा, त्याला विरोध करण्याची कोणाची हिमंत आहे ?.हल्ली राज्यक्तायर्च्या कोणत्याच निणर्याला कोणी विरोध करीत नाही. शरद पवारांनाही ते माहित अाहे,मग सरळ जी गोष्ठ होते त्यासाठी वाकड्यात जाण्याची गरज काय? सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा हा चेंडू सोलापूरकरांच्या कोटार्त टाकून वाद निमार्ण करायचा आणि त्यातून आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या धनगर समाजाचं लक्ष अन्यत्र वेधण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? अशी शंका घेतली जात आहे.राज्यकतेर्च समाजात अशा प्रकारे दुहीची बिजे पेरण्याचा उद्योग करीत असतील तर समाजात शांतता तरी कशी राहणार असा प्रश्न पडतो.