पत्रकारांना गाव पुढार्‍याची दमदाटी

0
1175

आम्ही म्हणतो तश्याच बातम्या द्या असा दुराग्रह अनेक राजकारणी पत्रकारांकडे धरतात.असा आग्रह धरताना पत्रकार म्हणजे आपल्या घरचे गडी आहेत असा त्यांचा समज असावा,सांगली जिल्हयातील पळुस येथील जिल्हा परिषदेचे माजी संभापती खाशाबा दळवी यांनी पळुस येथील पत्रकारांना असाच दम दिला आहे.माझं ऐकलं नाही तर तुम्हा सगळ्यांना बघून घेईल असा इशारा द्यायला दळवी विसरलेले नाहीत.गंमत म्हणजे हा सारा प्रकार कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या समोर घडला.पतंगराव कदम पळुसला आले असता पत्रकार त्यांना भेटायला गेले.तेव्हा दळवी तेथे आले आणि त्यांनी आपल्या नेत्यासमोर पत्रकारांना दमदाटी केली.या प्रकारामुळे पळुस मधील सर्व पत्रकार संतप्त झाले असून आज दुपारी चार वाजता पत्रकारांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविणार आहेत.सांगली जिल्हा पत्रकार संघ पळुसच्या पत्रकारांसोबत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here