पणजी : वादग्रस्त वक्तव्ये करून टीका ओढवून घेणारे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मीडियाशी ‘कट्टी’ घेतली आहे. आपण पुढचे सहा महिने मीडियाशी बोलणार नाही, असे त्यांनी शनिवारी स्पष्ट केले.
‘दहशतवाद हा दहशतवादानेच संपवायचा असतो’, ‘गेली ४०-४५ वर्षे भारताला युद्धच करावे लागले नसल्याने लष्कराचे महत्त्व कमी झाले आहे’, अशी विधाने करून संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी टीका ओढवून घेतली आहे.
शनिवारी पर्रिकर एका हॉस्पिटल इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास आले असता, एका पत्रकाराने त्यांना संरक्षणविषयक मुद्द्यावरून प्रश्न विचारला. त्यास उत्तर न देता, ‘मी सहा महिने मीडियाशी बोलणार नाही’, असे पर्रिकर यांनी तडकून सांगितले. मात्र, कट्टी सहा महिनेच का, त्याविषयी त्यांनी काहीच खुलासा केला नाही.