मराठी पत्रकार परिषदेचे App ठरतंय
महाराष्ट्रील वृत्तपत्रसृष्टीला एका धाग्यात जोडणारा दुवा
धानोरा, अहेरी, (जि. गडचिरोली) तुमसर, मोहाडी (जि. भंडारा) अर्जुनी, आमगाव, सालेकसा (जि. गोंदिया) वरोरा, देशीगंज, सावोली (जि. चंद्रपूर) महागाव, उमरखेड (जि. यवतमाळ) शहादा, अक्कलकुवा (जि. नंदूरबार), नरखेड, कामठी हिंगणा, कुही (जि. नागपूर) संगमेश्वर, गुहागर, दापोली (जि. रत्नागिरी) तळा, उरण (रायगड) सावंतवाडी, कणकवली (सिंधुदुर्ग) वडवणी, धारूर (बीड) भोकर, लोहा (नांदेड) मंगरूळपीर (वाशिम) करमाळा, अकलूज (सोलापूर) श्रीगोंदा, जामखेड (नगर) वाडा (पालघर)…
महाराष्ट्रातील ३५८ तालुक्यांपैकी हे काही तालुके.. परस्परांपासून कोसोमैल दूर… वातावरणापासून भाषेपर्यंत सारंच भिन्न.. त्यामुळे या ठिकाणच्या पत्रकारांचा परस्परांशी दुरान्वयानेही संबंध आणि संपर्क असण्याची शक्यता नाही.. एवढेच कश्याला वरील पैकी अनेक तालुक्यांची नावं देखील आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलेली नसतील.. हे सारे आणि उर्वरित सर्व तालुके आणि तेथील पत्रकार आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून परस्परांशी जोडले गेले आहेत.. जोडले जात आहेत.. मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्रातील वृत्तपत्र सृष्टीला एका धाग्यात जोडणारा दुवा ठरत आहे..
विचारांची देवाणघेवाण व्हावी, राज्यातील पत्रकारांची भक्कम एकजूट व्हावी, राज्यभर पत्रकारांचे मजबूत नेटवर्क तयार व्हावे, पत्रकारांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांची सामुहिक शक्ती उभी राहावी असे काही उद्देश परिषदेच्या अँपचे आहेत.. राज्यातील तमाम पत्रकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यातून मराठी पत्रकार परिषदेने उभारलेली चळवळ राज्याच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणे ही देखील भूमिका आपली आहे.. .. त्यामुळे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य नसलेले अनेक जण या अॅपवर आहेत.. जे नव्याने परिषदेशी जोडले जात आहेत आणि जे लिहिणारे पत्रकार आहेत त्यातील ९० टक्के पत्रकार आपले सदस्य होऊ इच्छितात.. मराठी पत्रकार परिषद ही राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असेल तर जे खरे, लिहिणारे पत्रकार आहेत त्यांना मराठी पत्रकार परिषदेच्या मुख्य प़वाहात सामावून घेणे आपले कर्तव्य आहे आणि जबाबदारी देखील आहे.. प़वाहात नवे लोक येत आहेत म्हणून आपले स्थान धोक्यात येईल या भितीने कोणी आदळआपट करण्याची गरज नाही.. ती काळाची गरज आहे.. कारण कधी दैनिकाच्या तर कधी प़ादेशिक अस्मितांना कुरवाळत तर कधी संघटनात्मक भिंती उभ्या करून आपण एवढ्या तुकड्यात विभागले गेलो आहोत की, राजकारणी आपल्यातील गटबाजीची कायम टिंगल करीत राहतात.. पत्रकारांची होणारी टिंगल टवाळी पाहून संताप येतो.. .. त्यामुळे आपणच उभ्या केलेल्या सर्व भिंतींना बुलडोझर लावून सारे पत्रकार एका छताखाली आले पाहिजेत ही परिषदेची इच्छा, आग्रह आणि प़यत्न आहे.. .. परिषदेचा पसारा राज्यभर विस्तारलेला असल्याने हे काम फक्त आणि फक्त अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदच करू शकत होती.. ते काम परिषदेने हाती घेतले आहे.. उशीर नक्कीच झालाय, पण हरकत नाही आता देर आये दुरुस्त आये असं म्हणता येईल.. .. मला खात्री आहे की, राज्यातील २५ हजार पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली एक झाले तर पुढील काळात पत्रकारांचा एकही प़श्न शिल्लक राहणार नाही..आणि पत्रकारांवर हल्ले करण्याची कोणाची हिंमत होणार नाही.. . हल्ले झाले तर हल्लेखोरांना आणि त्यांच्या मास्टरमाईंडला कायम स्वरूपी अद्दल घडविणयाचे बळ आपल्यात येणार आहे.. विचार करा, दहा वीस हजार पत्रकार एकत्र आले तर कोणाची हिंमत तरी होईल का? अंगावर येण्याची.. आमचा प़यत्न तो आहे.. . इतर अनेक विषय आहेत, आपली संघटीत शक्ती व्यवस्थेला दाखवून देऊ शकतो.. म्हणूनच मला या अॅपवर किमान पंधरा हजार पत्रकार असले पाहिजेत असे वाटते.. . आज ही संख्या पाच हजारावर पोहोचली आहे.. त्यात नांदेड जिल्हा आघाडीवर आहे.. नांदेड जिल्ह्यातील १०२५ पत्रकार app वर आहेत.. त्या पाठोपाठ सातारा ४८५, बीड ३८३, पुणे ३६६, परभणी ३२८,नागपूर ३१०, रायगड २३१, सांगली २२३, जालना १६१ आदिं जिल्ह्यांचा समावेश आहे.. अन्य जिल्हयातून ही मोठ्या संख्येने पत्रकार app च्या माध्यमातून मुख्य प्रवाहाशी जोडले जात आहेत.. एवढेच नव्हे तर दिललीसह शेजारच्या कर्नाटक, आंध़ पंदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा येथील मराठी भाषक पत्रकार देखील App च्या माध्यमातून महाराष्ट्रातील पत्रकार चळवळीशी जोडले जात आहेत.. या सर्वांचं मनापासून स्वागत.. राज्यातील तमाम पत्रकारांना आमचे आवाहन आहे की, जास्तीत जास्त संख्येने App मध्ये सहभागी होऊन राज्यातील पत्रकारांची ही चळवळ भक्कम करण्यासाठी, सर्वव्यापी होण्यासाठी योगदान द्यावे ..
आणखी एक.. आपण या App वर नोंदवले गेला आहात म्हणजे आपण मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य झाले आहात असे नाही.. ज्यांना परिषदेचे सदस्य व्हायचंय त्यांनी आपल्या तालुका अथवा जिल्हा पत्रकार संघाशी संपर्क साधावा.. शिवाय प़स्तुतच्या app कडून जो नोंदणी क़मांक आपणास मिळतो ते पत्रकारांचे ओळखपत्र नाही.. याची सर्वांनी नोंद ध्यावी
एस.एम.देशमुख