परिषद आणि पोटदुखीची परंपरा

0
1131

 २४ ऑगस्ट २०१३ :  मराठी पत्रकार परिषदेचं ३९ वे अधिवेशन  औरंगाबादला  ठरलं.पत्रकारांच्या प्रश्‍नांकडं दुर्लक्ष करणार्‍या सर्व पक्षीय राजकीय नेत्यांवर बहिष्कार टाकायचा निर्णय सर्वानुमते झाला. मुख्यमंत्र्यांसह कोणाही पुढाऱ्यांना  बोलावलं नाही.मा.नरेंद्र जाधव यांच्या हस्ते उद्दघाटन केलं गेलं.२२००  पत्रकार दोन दिवस उपस्थित होते.मात्र तत्पुर्वी या अधिवेशनालाही अपशकून करण्याचा प्रयत्न झाला,’पत्रकारांनी येऊ नये’ असे आवाहन केले गेले तरी अपेक्षेपेक्षाही जास्त संख्येनं पत्रकार आले,विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले.

६ जानेवारी २०१६  : मराठी पत्रकार परिषदेने  ६ जानेवारी १६ रोजी ऋुषीतुल्य पत्रकार दिनू रणदिवे यांचा सत्कार समारंभ आणि पुरस्कार वितरण सोहळा ठाण्यात आयोजित केला होता.या कार्यक्रमास शिवसेना पक्ष प्रमुख मा.उध्दव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते.त्यांनी या कार्यक्रमास येऊ नये म्हणून काही पोटदुखी मंडळी थेट मातोश्रीवर जाऊन बसली  होती .आठ हजार सदस्य असलेली परिषदच बोगस आहे इथ पासून जे जे तोंडाला येईल ते ते मा.उध्दव ठाकरे यांना सांगितले गेले.तरीही मा.उध्दव ठाकरे तर आलेच पण त्यांनी जाहीर कार्यक्रमात नतद्रष्टांची हजामत केली.’मी येऊ नये म्हणून कसा  प्रयत्न केला गेला हे त्यांनी सांगितले.एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर ‘दिनू रणदिवे यांचा सत्कार करण्याचे देशमुखांनाच का सूचले ?तुम्हाला का सूचले नाही.ते काही चांगलं करतात तर तुम्ही त्यांना का विरोध करता”? असे सुनावले.  विरोधकांची थोबाडं फुटली.
१२ जुलै २०१७ ः ऋुषीतुल्य पत्रकार मा.गो.वैद्य यांचा सत्कार कार्यक्रम नागपुरात होता.हा कार्यक्रम संघ कार्यालयातील महर्षि व्यास सभागृहात होता.यावेळेसही काही नतदृष्ट लोक  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्याकडं जावून बसले त्यांनी येऊ नये म्हणून प्रयत्नही केले. तरीही दोघेही आले.नितीन गडकरी तर गोव्यावरून नागपूरला आले आणि पुढे ते लखनौला रवाना झाले.कारण परिषद आणि देशमुख काय आहेत हे दोन्ही नेत्यांना चांगले माहिती आहे.मुख्यमंत्री येणार हे नक्की झाल्यावर परिषदेवर संघाचा प्रभाव,परिषद संघाच्या ताब्यात गेली  वगैरे कंडया पिकवायाला सुरूवात झाली.तश्या  बातम्या व्हायरल केल्या गेल्या ज्यांना माध्यमात काडीचीही किंमत नाही अशा गणंगांनी ‘कार्यक्रमास कोणी जावू नये’ असे आवाहन    सोशल मीडियावर केेलं गेलं  असतानाही अशा  लुच्च्या पत्रकाराच्या आवाहनाकडे  कोणीही लक्ष दिलं नाही एक हजारावर पत्रकार कार्यक्रमास आले.कार्यक्रम सुंदर झाला.सक्सेस  झाला मार्च २०१७ ः पनवेलमधील डीएनएचे पत्रकार सुर्यवंशींवर  हल्ला झाला होता. त्याचा निषेध करण्यासाठी खारघर येथे आंदोलन करायचं ठरलं होतं.ऐनवेळी हा कार्यक्रम ठरला होता.यावेळेसही काही तडीपारांनी उलट-सुलट बातम्या व्हायरल करून बुध्दीभेद करायचा प्रयत्न केला.तरीही  दिड– दोनशे पत्रकार आलेच.आंदोलन यशस्वी झालं.नंतर कायदा वगैरे झाला. नंतर पोस्ट आल्या आंदोलनाचा फज्जा उडाला.हे आम्ही गृहितच धरलं होतं.
. १९ ऑगस्ट २०१७ :  शेगाव अधिवेशनाची तारीख ठरली तेव्हा आम्हाला कल्पना होतीच की,यावेळेसही नवीन नवीन कंडया पिकवून गरळ ओकली जाणार झालंही तसंच.ज्या संस्थेची वार्षिक उलाढाल दोन-चार लाखांची नाही,ज्या संस्थेचं उत्पन्न केवळ आणि केवळ जिल्हा संघांकडून येणारी वर्गणी एवढेच आहे अशा संस्थेत कोटयावधींचे आर्थिक घोटाळे झाले म्हणून बोंब मारायला सुरूवात केली गेली.एवढंच नव्हे तर ‘या घोटाळ्याची बातमी मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेली आणि त्यांनी शेगावला येण्याचं रद्द केलं’ असा जावई शोधही लावला गेला.वस्तुस्थिती अशी आहे की,आम्ही तीन वेळा मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांनी येण्याचं मान्यही केलं.त्यांच्या सोयीनुसारच १९ तारीख ठरली.मात्र अचानक १८ ते २३ दरम्यान मुुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा ठरला आणि त्यानी आम्हाला तसे कळवले…त्यामुळं मुख्यमंत्री येऊ शकले नाहीत.तरीही भव्य-दिव्य कार्यक्रम होतोय ही आता पोटदुखी आहे.अन हो..प्रमुख पाहुणे कोण आहेत हे पाहून अधिवेशनास येण्याची परिषदेची परंपरा नाही.औरंगाबादला एकही सिलिब्रेटी नसताना बावीसशे पत्रकार होते.त्यामुळं गर्दी जमविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं नाव वापरण्याचीही परिषदेला कधी गरज पडत नाही.
तात्पर्य..… परिषदेचा कार्यक्रम ठरला रे ठरला की,आरोपांना सुरूवात होते.आम्हालाही आता अशा आरोपांंची एवढी सवय झालीय की,पिंपरी (पुणे) अधिवेशनाच्या वेळेस कोणताच आरोप झाला नाही तेव्हा चुकल्यासारखे झाले.विरोधकांना आम्ही धन्यवाद देतो.ते जेवढे अडथळे आणतात तेवढयाच जिद्दीनं आम्ही कामाला लागतो.आणि हाती घेतलेलं काम यशस्वी करून दाखवितो.आमच  मन साफ आहे,उद्देश नेक आहे आणि हात स्वच्छ आहेत हे राज्यातील पत्रकारांना माहिती आहे म्हणूनच बेरक्या –फेरक्याच्या  आरोपाची कोणी दखलही घेत नाही.आमच्या प्रत्येक कार्यक्रमास पत्रकार भरभरून प्रतिसाद देतात.यावेळेस शेगावमध्ये हेच चित्र दिसणार आहे.आरोप करणाऱ्यांंना विनंती आहे की,शेगावचा नजारा बघण्यासाठी त्यानी जरूर शेगावला यावं… मित्रांनो,आरोप करणाऱ्यांंचंं  चरित्र आणि चारित्र्यही महत्वाचं असतं.तडीपारीची कारवाई झालेले मुके–‘बहिरे’ आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार,महिलांचा विनयभंग यासारखे गंभीर आरोप असलेल्या आणि उस्मानाबादहून जे पार्सल पुण्याला रवाना केलं गेलंय अशा  सडक्या गुळाच्या ‘ढेपी’ आमच्यावर आरोप करीत असतील तर कोण विश्‍वास ठेवणार त्यावर ?.स्वतःच्या नावासह आरोप करण्याची ज्यांची हिंमत नाही अशा लुच्च्यांना आणि लुंग्या-सुंग्याना महाराष्ट्रातील पत्रकार महत्व देत नाहीत.हे अनेकदा दिसून आलंय.परिषदेचं काम समोर आहे,परिषद करू इच्छित असलेले विधायक काम पत्रकारांना दिसते आहे,म्हणूनच देशमुखांवर होणार्‍या आरोपावर शेबडं पोर देखील विश्‍वास ठेवत नाही. आमचा निर्धार आहे, तुम्ही बोंबलत राहा…आम्ही पत्रकाराच्या हिताचं, हक्कासाठीचं काम करीत राहू..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here