मराठी पत्रकार परिषदेने नेहमीच पत्रकारांच्या हिताचे प्रश्न आक्रमकपणे मांडले आहेत.ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती देताना त्याचे वय 50 वर्षे आणि अनुभव 20 वर्षे ग्राहय धरावा असा आग्रह परिषदेने सातत्यानं धरेलेला होता.अधिस्वीकृती समितीच्या पुण्यात झालेल्या बैठकीतही याबाबतचा ठराव मंजूर झाला होता.पण पत्रकारांच्या प्रश्नांत नेहमीच टांग अडविणारे काही झारीतील शुक्राचार्य त्या संबंधीचा जीआर काढायला टाळाटाळ करीत होते.त्यावरून काल ठाण्यात झालेल्या अधिस्वीकृती समितीच्या बैठकीतही एस.एम,देशमुख किऱण नाईकआणि कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष या नात्यानं सर्वांचे स्वागत करताना मिलिंद अष्टीवकर यांनी आक्रमकपणे हा मुद्दा मांडत सदस्य सचिवांना चांगलेच धारेवर धरले होते.त्याचा योग्य तो परिणाम झाला असून आज त्यासंबंधीचा जीआर सरकारने काढला आहे.त्यामुळं यापुढं ज्याचं वय पन्नास आहे आणि ज्यांचा अनुभव वीस वषांचा आहे अशा पत्रकारांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती मिळणार आहेे.राज्यातील पाचशेवर पत्रकारांना या नव्या नियमांचा लाभ होणार आहे.
परिषदेमुळे नियम बदलला…
पन्नास वर्षे वय असलेल्या पत्रकारांना ज्येष्ठ
पत्रकार म्हणून अधिस्वीकृती मिळणार