परिषदेचा उद्या वर्धापन दिन

0
753

मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेचा बुधवारी वर्धापन दिन आहे.या दिवशी परिषद आपले 75 वर्षे पूर्ण करून 76 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.3 डिसेंबर 1939 रोजी स्थापन झालेल्या परिषदेचे पहिले अध्यक्ष कृ.ग.तथा काकासाहेब लिमये होते.तेव्हा लोकप्रिय असलेल्या ज्ञानप्रकाशचें ते संपादन करीत.परिषदेचं पहिलं अधिवेशन मुंबईत भरलं आणि 38 वं अधिवेशन 2013 मध्ये औरंगाबादला भरलं होतं.परिषदेचे नशिब असं की,हिमालयाच्या उंचीचे अनेक मान्यवर पत्रकारांनी परिषदेचं अध्यक्षपद भूषविलं आहे.त्यात न.र.फाटक,य.कृ.खाडिलकर,पा.वा.गाडगीळ, आचार्य अत्रे ,प्रभाकर पाध्ये,ह.रा.महाजनी,बाळासाहेब भारदे,त्र्य.र.देवगिरीकर,अनंतराव भालेराव,रंगा वैद्य,बाबूराव ठाकूर आदिंचा उल्लेख करता येईल.या सर्व अध्यक्षांनी परिषदेला प्रतिष्ठा आणि नावलैकिक मिळवून दिला,आणि पत्रकारांचे अनेक प्रश्नही मार्गी लावले.आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हयात आणि तालुक्यात परिषदेच्या शाखा आहेत.जवळपास सात हजार पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले आहेत.महाराष्ट्रात आजही परिषदेचा दबदबा कायम आहे.
परिषदेच्यावतीने यंदा 3 डिसेंबर रोजी प्रथमच वर्धापनदिन साजरा केला जात आहे.वर्धापन दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हयात,तालुक्यात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन कऱण्यात आले आहे.गेल्या सहा महिन्यात राज्यातील पाच पत्रकारांचे ह्रदयविकाराने अकाली मृत्यू झाले आहेत.या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा हाती घेणं आवश्यक होतं.याच जाणिवेतून 3 डिसेंबरला राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिंर ं आयोजित केली आहेत.असं शिबिर रत्नागिरीत कालच पार पडलं.उद्या काही ठिकाणी ही शिबिरं होत आहेत.3 डिसेंबरला सर्वत्र अशा शिबिरांचे आयोजन केलं गेलं आहे.ज्या पत्रकार संघांनी पत्रकार आरोग्य शिबिरांचे आयोजन केल नसेल त्यांना विनंती आहे की,त्यांनी आपल्या गावातील स्वयंसेवी संस्था किंवा डा्रक्टरांच्य मदतीनं हीशिबिरं आयोजित करून परिषदेचा वर्धापन दिन साजरा करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here