मराठी पत्रकार परिषदेच्या एका शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेदद्र फडणवीस यांची पुणे येथे भेट घेऊन त्यांना परिषदेच्या अधिवेशनाचे निमंत्रण दिले.परिषदेचे अधिवेशन 6 आणि 7 जून रोजी पिंपरी-चिंचवड येथे होत असून या अधिवेशनाचे उद् घाटन मुख्यमंत्र्यांनी करावे अशी विनंती त्यांना करण्यात आली .मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनास येण्याचे मान्य केले आहे.आज मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख,उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे,उपाध्यक्ष सुनील वाळूंज,शहराध्यक्ष राजेंद्र कापसे,तसेच दत्ता जोरकर,कृष्णकांत कोबल,विवेकानंद काटमोरे,भालेराव आदि पत्रकार उपस्थित होते.